नवी दिल्ली-मुंबईतील निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून करण्यात आली. व्यंगचित्र फार्वड केल्यामुळे शिवसैनिकांनी रात्री निवृत्त नौदल अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. मारहाणीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संबंधितांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मदन शर्मा असं या माजी नौदल अधिकारी यांचं नाव आहे. सोशल मीडियावर सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शुक्रवारी ८ ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी यांना मारहाण केली होती.
Spoke to retired naval officer, Madan Sharma who was attacked by hooligans in Mumbai and enquired about his health. Such attacks on ex-Servicemen is completely unacceptable and deplorable. I wish Madan ji a speedy recovery: Defence Minister Rajnath Singh (file pic) pic.twitter.com/VEd1V2c8gh
— ANI (@ANI) September 12, 2020
राजनाथ सिंह यांनी फोन करून मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर ट्विट करतान राजनाथ सिंह यांनी म्हटले की, काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मारहाण केलेल्या सगळ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र बाऴासाहेब ठाकरे स्वत: प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते मग या फाॅर्वड केलेल्या व्यंगचित्रावर राग का?, असा सवाल सगळ्या स्तरातील लोकांकडून विचारला जातो आहे.