चिंबळी -खेड तालुक्यातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ, गोलेगाव, चल्होरी खुर्द, वडगाव, चाकण, रासे, भोसे, शेलपिपंळगाव, मोशी, डुडूळगांव परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी आणि गहू पिकाची काढणी करून, ट्रॅक्टरच्या साह्याने मळणीची कामे सुरू केली आहेत.
पधंरा दिवसांपासून करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारच्या वतीने पेट्रोल पंपावर बंदी घातली असल्याने मोजकेच डिझेल मिळत असल्यामुळे मळणीधारकांनी दर वाढविले असून, एका पोत्यास 300 रुपयांप्रमाणे दर घेण्यात येत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मध्यंतरी झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ज्वारीची कणसे काळी पडली, तर गव्हाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्यासाठी खर्च केला असून, गेल्या महिन्यापासून या परिसरात शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू पिकाची काढणी करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मळणीची कामे सुरू केली आहे.