पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमए मराठी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी निवडलेल्या गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी दि. 19 डिसेंबरपूर्वी प्रवेश निश्चित करावा, असे मराठी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ऑनलाइन स्वरुपातून रितसर प्रवेश घेताना प्रवेशप्रक्रियेच्या संलग्न परिपत्रकानुसार सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी दि. 19 डिसेंबरपूर्वी आवश्यक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्यांचा प्रवेशाचा दावा रद्द होईल.
जागा रिक्त राहिल्यास प्रवेशाची दुसरी यादी दि. 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी सांगितले.