लक्‍झरी कारच्या विक्रीवरही नकारात्मक परिणाम

नवी दिल्ली – वाहन क्षेत्रातील मंदीचा आता लक्‍झरी कारच्या विक्रीवरही परिणाम होत आहे. मर्सिडिज बेंझ कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून या 6 महिन्यांत या कंपनीच्या वाहनांची विक्री 18.6 टक्‍क्‍यानी कमी होऊन केवळ 6,561 एवढी झाली आहे.

गेल्या वर्षी या कालावधीत कंपनीने 8,061 वाहनांची विक्री केली होती. स्थूल अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, चलनबाजारात अनिश्‍चितता आहे, भांडवल सुलभता कमी आहे, त्याचबरोबर कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत या कारणामुळे वाहन विक्रीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मार्टिन स्वेंक यांनी सांगितले. तरीही इतर लक्‍झरी कार कंपन्यांच्या तुलनेत आमची विक्री समाधानकारक आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर या विक्रीत वाढ होण्याची शक्‍यता त्यांना वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.