आयपीएल2019 : एनगिडीची दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार

चेन्नईच्या संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली असून हा चेन्नईच्या संघाला मोठा धक्‍का समजला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा 22 वर्षीय जलदगती गोलंदाज एनगिडीच्या दुखापतीने डोकेवर काढले आहे आणि त्यामुळे त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती आणि त्यातून इतक्‍यात सावरणे शक्‍य नसल्याने तो आयपीएलच्या सामन्यांना मुकणार आहे. चेन्नईने एन्गिडीला पर्यायी गोलंदाजांची घोषणा केलेली नाही.

एनगिडीच्या दुखापतीबद्दल दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करणे एनगिडीला जमले नव्हते. त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यापासून त्वरित रोखण्यात आले. त्याच्या स्नायूत दुखापत झाली आहे आणि त्याला चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर तो विश्‍वचषक स्पर्धेसाठी पुर्नविकास केंद्रात सहभागी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.