चांद्रयान -2 च्या ऑर्बिटरने पाठवले चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो

इस्रोकडून चंद्राचा फोटो प्रसिद्ध

नवी दिल्ली : इस्रोने चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्यामधून चंद्राच काढलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. या उच्च रिझोल्यूशन कॅमेऱ्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले आहे. या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावर मोठे आणि लहान खड्डे असल्याचे दिसत आहे. ऑर्बिटरने काढलेले हे फोटो इस्रोकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

ऑर्बिटरमध्ये उपस्थित असलेल्या आठ पेलोडने चंद्राच्या पृष्ठभागावर उपस्थित असलेल्या घटकांबद्दल बरीच माहिती पाठविली असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागावर उपस्थित आवेशित कण शोधत आहे. ऑर्बिटरने आपल्या कक्षाच्या पेलोड वर्गाने त्याच्या तपासणीत चंद्राच्या मातीमध्ये असलेले कण उघड केले आहे. हे ज्यावेळी चंद्रावर सूर्यप्रकाश पडल्यानंतर किरणांमुळे चंद्राचे पृष्ठभाग चमकत होते त्यावेळी हे शक्‍य झाले असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

चांद्रयान -2 चा लॅंडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर पडला आहे त्यामुळे वैज्ञानिकांना पुन्हा त्याच्याकडून आशा आहे. तसेच शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे की, त्याच्या सौर पॅनल्सच्या सहाय्याने विक्रम पुन्हा कामाला सुरुवात करू शकेल. चंद्रावर शनिवार म्हणजे आजपासून दिवसाची सुरूवात होत आहे. अशा परिस्थितीत विक्रमबद्दल काही चांगल्या बातमीची अपेक्षा वाढली आहे. त्याचबरोबर चांद्रयान-2 चे ऑर्बिटर चंद्राच्या आकाशात फिरत असून तिथल्या सोडियम, कॅल्शियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन, टायटॅनियम आणि लोह यासारख्या महत्त्वपूर्ण खनिज घटकांचा शोध घेण्याचे काम करीत असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.