शिक्रापूर (वार्ताहर)– डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील आयटीसी कंपनीतील पाच लाखांचा माल घेऊन जाणारा ट्रान्सपोर्ट चालक मुद्देमालासह फरार झाला असल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजेंद्र (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), टेम्पोचालक तात्यासाहेब किसन गवारे (रा. चिंचाळा, ता. पैठण), टेम्पोमालक नामदेव बोडखे व ओम ट्रान्सपोर्ट चाकणचे व्यवस्थापक सुरेंद्र त्रिपाठी अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर नरेंद्रसिंग जयसिंग शेखावत (रा. डिंग्रजवाडी; मूळ रा. सूरजपुरा, जि. जयपूर राजस्थान) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
डिंग्रजवाडी येथे आयटीसी कंपनी असून या कंपनीतील वेगवेगळ्या वस्तू पाठविण्यासाठी राजमुनी ट्रान्सपोर्ट हे नेमण्यात आलेले आहे. ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक नरेंद्रसिंग शेखावत यांना चार ते पाच दिवसांपासून एका मोबाईल नंबरवरून राजेंद्र नावाच्या व्यक्तिचा फोन येत होता.