मुंबई – आयपीएलच्या हंगामात पहिल्यांदा मैदानात उतरणाऱ्या लखनौने संघ बांधणीला सुरुवात केली आहे. त्यांनी झिम्बाब्वेचे माजी कसोटीपटू अँडी फ्लावर यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त केले असून गौतम गंभीरला मेंटार म्हणून निवडले आहे. हा संघ लोकेश राहुलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
लखनौने लोकेश राहुल आणि राशिद खानसोबत बोलणी सुरु केल्याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात पंजाब किंग्ज आणि हैदराबादने आक्षेपही नोंदवला होता. त्यामुळे त्यांच्या संघ बांधणीत कोणत्या तीन खेळाडूंना संघात घेणार हे पाहण्याजोगे ठरेल.