– आयपीएल स्पर्धेचा थरार सध्या सुरु आहे. आज लखनौ विरुद्ध पंजाब असा सामना माहोली येथे सुरु आहे. सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा पंजाबचा निर्णय या सामन्यात सपशेल अयशस्वी ठरला आहे. लखनौने निर्धारित २० षटकांमध्ये — बाद २६० इतक्या धावांचा डोंगर उभारला आहे.
लखनौचा कर्णधार के एल राहुल याला स्वस्तात तंबूत पाठवल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांना लखनौच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. लखनौचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत असल्याचेच चित्र संपूर्ण सामन्यात पाहायला मिळाले.
मार्कस स्टॉइनिस ४० चेंडूत ७० धावा, काइल मेयर्स २४ चेंडूत ५४ धावा, निकोलस पूरन १९ चेंडूत ४५ धावा, आयुष्य बडोनी २४ चेंडूत ४३ धावा या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले.लखनौच्या फलंदाजांनी या सामन्यात २७ चौकार व १४ षटकार खेचत पंजाबच्या तोंडचे पाणी पळवले.
सर्वाधिक धावसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर
लखनौने निर्धारित २० षटकांमध्ये २५७ धावांचा डोंगर उभारला असून ही आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी बंगलोरच्या संघाने २० षटकांत २६३ धावा कुटल्या होत्या. दोन नंबरची धावसंख्या देखील बंगलोर संघाच्याच नावावर (२४८) होती मात्र लखनौच्या फलंदाजांनी हा विक्रम मोडत आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या उभारली.
विजयासाठी २५८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरणारा पंजाब विजय मिळवतो का यापेक्षा विजयाच्या किती जवळ जातो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.