मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील 15 वा सामना आज खेळवला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने आहेत. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
#LSG have won the toss and they will bowl first against #DelhiCapitals
Live – https://t.co/RH4VDWYbeX #LSGvDC #TATAIPL pic.twitter.com/zZu2ohQxvx
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2022
डेव्हिड वॉर्नर या मोसमातील पहिला सामना खेळत आहे. लिलावात दिल्लीने वाॅर्नरला 6.25 कोटींना खरेदी केलं . वॉर्नर 9 वर्षांनंतर दिल्लीच्या संघामध्ये परतला आहे. यापूर्वी तो 2009 ते 2013 दरम्यान दिल्लीकडून खेळला होता. तो 2014 ते 2021 पर्यंत सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. त्याचवेळी दुसरीकडे लखनौने मनीष पांडेच्या जागी कृष्णप्पा गौतमला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्ट्या, मुस्तफिझूर रहमान.
दरम्यान, लखनौचा संघ तीनपैकी दोन सामने जिंकत पाचव्या तर दिल्लीचा संघ एक विजय आणि एका पराभवासह सातव्या स्थानावर आहे.