LPG Cylinder – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने मंगळवारी केरळसाठीचा निवडणूक जाहीरनामा जारी केला. त्यामधून त्या राज्यातील जनतेवर विविध आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला. लक्षवेधी आश्वासनांमध्ये गरीब कुटूंबांना दरवर्षी २ मोफत गॅस सिलिंडर ( LPG Cylinder ) देण्याच्या हमीचा समावेश आहे. एनडीएमधील घटक पक्षांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. सध्या देशभरात गॅस सिलिंडर टंचाईसदृश स्थिती आहे. त्यामुळे एनडीएने मोफत सिलिंडरविषयी दिलेले आश्वासन चर्चेचा विषय ठरणार आहे. LPG Connection Booking: गरजू महिला आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचेही आश्वासन विशेष ठरले आहे. त्यानुसार, गरीब कुटूंबांमधील महिलांना २ हजार ५०० रूपयांचे एक कार्ड उपलब्ध केले जाईल. ते दर महिन्याला रिचार्ज केले जाईल. त्या कार्डच्या माध्यमातून महिला औषधे आणि किराणा दुकानांमधून खरेदी करू शकतील. गरीब कुटूंबांमधील महिला प्रमुख, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३ हजार रूपयांची पेन्शन पुरवली जाईल. हे देखील वाचा : LPG Cylinder Shortage : पुन्हा करोनासारखी परिस्थिती? गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे कामगारांचे गावाकडे पलायन डाव्या पक्षांची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये मागील काही काळापासून शबरीमला सोनेचोरीचे प्रकरण गाजत आहे. त्या प्रकरणी सीबीआयमार्फत कालबद्ध चौकशीची ग्वाही एनडीएने जाहीरनाम्यातून दिली आहे. केरळमध्ये एम्स आणि हाय-स्पीड रेल्वे जाळे उभारण्याची हमीही देण्यात आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत यावेळीही डाव्या पक्षांची आघाडी विरूद्ध कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी अशी मुख्य लढत होण्याचा अंदाज आहे. तसे असले तरी यावेळी एनडीएने आणि विशेषत: भाजपने त्या राज्यात राजकीय प्रभाव दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिलला मतदान होईल. ही बातमी वाचा : दुर्दैवी घटना..! पाणी साठवण तलावात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, एकाचा थरारक बचाव