LPG Cylinder Price : आज पुन्हा महागला गॅस सिलेंडर; 3 महिन्यात 200 रूपयांनी वाढली किंमत

LPG Cylinder Price : पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत, त्यात आज गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजट कोलमडले आहे. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ केलीय. ही वाढ आजपासून (25 फेब्रु) लागू होत आहे. आता सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 794 रूपये झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात तीन वेळेस एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. यावरून पुढील महिन्यात देखील या किंमती अजून वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरपासून तब्बल 200 रूपयांनी सिलेंडर महागला आहे. तीन महिन्यात 594 रूपयांवरून गॅसची किंमत 794 रूपये झाली आहे.

असे वाढले दर –

-1 डिसेंबर रोजी दर 594 रुपयांवरून 644 रुपये प्रति सिलेंडर

-1 जानेवारी रोजी दर 644 रुपयांवरून 694 रुपये प्रति सिलेंडर

-4 फेब्रुवारी रोजी दर 694 रुपयांवरून 719 रुपये प्रति सिलेंडर

-15 फेब्रुवारी रोजी दर 719 रुपयांवरून 769 रुपये प्रति सिलेंडर

-25 फेब्रुवारी रोजी दर 769 रुपयांवरून 794 रुपये प्रति सिलेंडर

कमर्शिअल गॅसची किंमत काय आहे ?

साधारणपणे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती बदलत असतात. फेब्रुवारी महिन्यात देखील कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 190 रूपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये या 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरची किंमत 1533.00 रूपये प्रति सिलिंडर तर मुंबईत 1482.50 रूपये, कोलकातात 1598.50 रूपये, आणि चेन्नईमध्ये 1649.00 रूपये आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.