नवी दिल्ली – नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. IOCL च्या मते, 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 102 रुपयाने कमी करण्यात आली आहे. आज कमी झालेल्या किंमतीनंतर एलपीजी गॅसची किंमत 1 हजार 998.5 पर्यंत खाली आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आजपासून मुंबईत 1 हजार 948.50 रुपयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमती झाली आहे. आज झालेल्या कपातीमुळे हॉटेल व्यावसायिकांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मागील डिसेंबर महिन्यात कमर्शियल एलपीजी सिलेंडरचे दर वाढवले होते. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
31 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2 हजार 51 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 2 हजार 131 रुपये, दिल्लीत 1 हजार 998.5 रुपये मोजावे लागणार आहेत.
नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राजधानीत राहणाऱ्या लोकांना घरगुती गॅस सिलिंडर 900 रुपयांना अनुदानाशिवाय मिळत राहतील. इतर शहरांमध्ये काय दर आहेत ते जाणून घेऊया- दिल्ली 900, मुंबई 900, कोलकाता 926, चेन्नई 916, लखनऊ 938, जयपुर 904, पटना 998, पुणे 909, अहमदाबाद 907