राष्ट्रावादीचे एकनिष्ठ कळमकर शिवबंधनात

अहमदनगर: राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते व शरद पवार यांचे निकटवर्ती दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषक कळमकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे या प्रवेशाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे ही निवडणुक आणखीनच अटीतटीची होणार असल्याचे ही बोलले जात आहे.

नगर येथील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार व माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नंदनवन लॉन्स येथे आले होते. यावेळी कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्काच दिला असल्याचे बोलले जात आहे.

गेली 40 वर्ष कळमकर कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व अभिषेक कळमकर यांच्यात अंर्तगत वादामुळेच कळमकर यांनी शिवबंधन स्विकारले असावे.

तसेच त्यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, विद्यमान आमदार जगताप यांना उमेदवारी दिल्याने कळमकर गट नाराज होवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here