Pune News | सिंहगड रस्ता परिसरात आज कमी दाबाने पाणी..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वडगाव जलकेंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कामासाठी गुरुवारी (३१ जुलै) दुपारी १२ ते २ या कालावधीत दोन तासांसाठी पंपिंग यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत संबंधित भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा होणारे भाग
वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग क्रमांक २, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग यंत्रणेखालील भाग
सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदामातानगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर (भाग १ आणि २), राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारतनगर, वरखडे नगर (जुना प्रभाग ३८), संपूर्ण जुना प्रभाग ४१ आणि येवलेवाडी परिसर.




