नवी दिल्ली – भारतीय हवामानखात्याच्या चक्रीवादळ इशारा विभागाने दिलेल्या इशारानुसार अंदमान समुद्रावर 9 ऑक्टोबर दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि दोन दिवसांत तो उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशा किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्मिचेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा 5 ऑक्टोबरपर्यंत कायम राहून हळूहळू कमी तीव्रतेचा होत जाईल.
तथापी, चक्रीवादळ 6 ऑक्टोबरपर्यंत छत्तीसगढकडे सरकत जाईल आणि 7 ऑक्टोबरपर्यंत कायम राहील. अंदमान आणि निकोबार बेटांवर 9 आणि 10 ऑक्टोबर मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते.
तसेच सध्या वायव्य बंगाल आणि ओदिशा किनाऱ्यावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.