नागपूर – प्रियकराने प्रेयसीवर चाकूने गळा कापत जीवे मारण्याचा पर्यंत केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर शहरात गेल्या आठवड्यात एकाच कुटूंबातील पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असताना आज हा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
20 वर्षीय प्रेयसी या हल्यात जखमी झाली आहे. प्रताप दमके, वय 21 असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. या घटनेप्रकरणी इमामवाडा पोलिस स्टेशन तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून निखिलचा शोध सुरू केला आहे.
निखिल व त्याची प्रेयसी एकाच वस्तीत वास्तव्यास होते. तेथेच या दोघांचे सूत जुळले निखिल हा गॅरेजमध्ये काम करीत होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचे काम गेले त्यानंतर त्याने पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे काम सुरु केले. त्याला दारुचे व्यसन सुद्धा होते. तर त्यांची प्रेयसी हॉस्पिटलमध्ये काम करते. दोघांची जवळीक वाढत गेली त्यानंतर निखिलने लग्नाची मागणी केली. प्रेयसीने पण लग्नास होकार दिला मात्र तिच्या कुटुंबियांना या दोघांचे नाते मान्य नव्हते. त्यानंतर निखिलने पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर हे दोघे रामेश्वरी भागात राहायला गेले.
घरातील आर्थिक चणचणीमुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले. त्यातच निखिलचे लॉकडाउनमुळे काम सुटल्याने तणावात दारू प्यायला लागला. प्रेसयीशी वाद घातल्यानंतर मारझोड सुरू केली. त्यामुळे कंटाळून ती माहेरी उंटखाना येथे राहायला आली. निखिल हा आईलासुद्धा त्रास देऊ शकतो म्हणून ती भाड्याने खोली घेऊन राहत होती. निखिल तिथेही तिच्यासोबत वाद घालायचा आणि मारहाण करायचा.
या सर्वप्रकाराला कंटाळून प्रेयसीने इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. दरम्यान पोलिसात तक्रार दिल्यामुळे निखिल आणखीच चिडला त्यानंतर या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच निखिलने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करत चाकूने गळा कापला. तिने आरडाओरड केली त्यामुळे निखिल पसार झाला. जखमी अवस्थेत प्रेयसीने मैत्रिणीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि घरी बोलाविले. मोपेडवर ती मैत्रिणीसोबत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले.