रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीला पेटवलं; तिने मारली त्यालाच मिठी; पुढे घडलं असं…

मुंबई : प्रेम प्रकरणातून हत्या आणि आत्महत्यांचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर अनेकदा एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला ठार मारण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या प्रियकराचा मृत्यू झाला असून पीडित युवती मृत्यूशी झुंज देत आहे.

जोगेश्वरी विभागातील मेघवाडी परिसरात ही धक्कादायक अशी घटना घडली आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोप टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, एक युवती तिच्या कुटुंबासोबत मेगवाडी येथे राहात होती. तर तिचा प्रियकर जवळच राहात होता. विजय खांबे असं त्याचं नाव होतं. विशेष म्हणजे विजय पीडित युवतीच्या बहिणीचा दीर होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्यामुळे युवतीच्या घरच्यांचा दोघांच्या लग्नाला विरोध होता.

लग्नाला नकार दिल्यामुळे विजय पीडित युवतीला सारखा त्रास देत होता. या त्रासातून युवतीने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. मात्र आठ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर युवतीचा जीव वाचला होता. या घटनेनंतर विजय युवतीला पाहण्यासाठी तिच्या घरी गेली होता. यावेळी त्याने सोबत एक पेट्रोलची बाटलीही नेली होती.

दरम्यान घरी एकटी असलेल्या युवतीसोबत विजयचं भांडण झालं. रागाच्या भरात विजयने पेट्रोल टाकून युवतीला पेटवून अर्थात आपल्या प्रेयसीला पेटवून दिले आणि दारात उभा राहून तिला होरपळताना पाहू लागला. यावेळी पेटलेल्या युवतीने विजयला कडाडून मिठी मारली. त्यामुळे दोघेही यात भाजले. शेजारच्यांनी दोघांना लागलेली आग विझवली. मात्र यात गंभीर भाजलेल्या विजयचा मृत्यू झाला. तर युवती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.