प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; मुलीचा मृत्यू

मुलास जिल्हा रुग्णालयात केले दाखल
नगर –
जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला, मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (दि.4) रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अवंतिका रघुनाथ दळवी (वय.21 रा. कडा) असे मृत मुलीचे नाव आहे. मुकुंद बाबासाहेब भोजने (वय.25) हा जखमी युवक आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवार रात्री ते नगर-जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात असणाऱ्या एका बंद पडलेल्या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे दोघांनी गळफास लावून घेतला. मुलाचे नातेवाईक त्यांना शोधत आले होते. त्यावेळी बंद पडलेल्या हॉटेलमध्ये ते दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली घेऊन नगर येथे एका खासगी रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला आहे, तर युवक बेशुद्ध असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नगर तालुका पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.