बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी देखील भारताचे वेटलिफ्टिंगमधील वर्चस्व आबाधित राहिले. स्टार खेळाडू लवप्रीत सिंगने पुरुषांच्या 109 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाला गवसणी घातली.
लवप्रीतने स्नॅचमध्ये 163 तर, क्लीन आणि जर्कमध्ये 192 किलो असे एकूण 355 किलो वजन उचलत पदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे 9 वे पदक ठरले आहे. लवप्रीतच्या या यशस्वी कामगिरीमुळे आता भारताची पदकसंख्या 14 झाली आहे.
स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने 157 किलो तर दुसऱ्या प्रयत्नात 161 व तिसऱ्या प्रयत्नात 163 किलो वजन उचलले. क्लीन आणि जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात 185 किलो, दुसऱ्या प्रयत्नात 189 तर तिसऱ्या प्रयत्नात 192 किलोग्रॅम वजन उचलले.
LOVEPREET WINS BR🥉NZE !!
The weightlifting contingent is giving us major MEDAL moments at #CommonwealthGames2022🤩
Lovepreet Singh bags Bronze🥉 in the Men’s 109 Kg category with a Total lift of 355 Kg
Snatch- 163Kg NR
Clean & Jerk- 192Kg NR
Total – 355kg (NR) pic.twitter.com/HpIlYSQxBZ— SAI Media (@Media_SAI) August 3, 2022
यंदाच्या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अचिंत शेउली यांनी सुवर्ण महिला लॉन बॉल्स संघ व टेबल टेनिस पुरुष संघाने सुवर्ण प्राप्त केले आहे. सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर व भारतीय बॅडमिंटन संघ यांनी मिळून पाच रजतपदके पटकावली आहेत. तसेच गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर व लवप्रीत सिंग यांनी ब्रॉंझपदक मिळवले आहे.