बॉलिवूडमधील एक सशक्त अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली जया बच्चन यांचा आज जन्मदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलगा अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, करोनामुळे लॉकडाऊन असल्याने जया बच्चन या दिल्लीत आहेत.
जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा अभिषेक याने एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना वक्त केल्या आहेत. त्याने जया बच्चन यांचा एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. अभिषेकने लिहिले आहे की, जसे प्रत्येक मुलगा आपल्याला सांगेल मी, त्याचा आवडता शब्द “आई’ आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! सध्या देशात करोनाने कहर केला असल्याने 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने तू दिल्लीत आहे आणि आम्ही मुंबईत आहोत, पण आम्ही तुझा विचार करत आहोत आणि तू आमच्या अंतःकरणात आहे. आई लव यू!
वर्क फ्रंटबाबत बोलायाचे झाल्यास अभिषेकचा “मनमर्जिया’ हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल आणि तापसी पन्नू यांनी दमदार भूमिका साकारली होती. तसेच तो अनुराग बसू यांच्या आगामी “लुडो’ चित्रपटात झळकणार आहे. यात अभिषेकसोबत राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रा आदी कलाकार भूमिका साकारत आहेत.