फेसबुकवर जुळलं, हिंदू असल्याचे भासवून केलं लग्न; कमेंटमुळे प्रकरण उघडकीस

कानपूर – हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी समाज माध्यमांत हिंदु असल्याचे भासवणाऱ्या मुस्लिम तरूणाला नव्या बेकायदा धर्मांतर कायद्याखाली अटक करण्यात आली. या मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर या घटनेवर प्रकाशझोत पडला. या मुलाचे नाव तौफीक असे आहे. तो फेसबुकवर राहुल वर्मा या नावाने पोस्ट लिहित असे.

एका हिंदु मुलीशी त्याची फेसबुकवर ओळख झाली. या काळात मुलीला त्याने आपण लखनौमध्ये रहात असल्याचे सांगितले. या मुलीने हट्ट केल्याने तिच्या कुटुंबियांनी तिचा विावह या मुलाशी ठरवला. 10 डिसेंबरला तो हिंदु धर्माच्या विधीप्रमाणे पार पडला. त्यावेळी त्याने आपण कुटुंबियांशी संबंध तोडले असल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ वधुपक्षाचे लोक विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

त्याने आपला विावह झाल्याचे समाज माध्यमांत उघड केल्यावर निकाह कधी झाला, अशा कमेंट येऊ लागल्या. त्यामुळे त्याचा खोटारडेपणा उघड झाला. त्यांतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचे खरे नाव उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.