प्रेम म्हणजे हिसकावणं की समर्पण, ‘पाहिले न मी तुला’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

शशांक केतकर प्रथमच नकारात्मक (निगेटिव्ह) भूमिकेत

शशांक ची २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)


मालिकेतून तो पुनरागमन करतोय, पण शशांक ह्या मालिकेत समरप्रताप ही नकारात्मक (निगेटिव्ह) भूमिकेत दिसणार आहे. शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

पहिले न मी तुला ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम लग्नाच्या नात्यात अडकण्याआधीच समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे दिसून येईल. तेव्हा पाहायला विसरू नका पाहिले न मी तुला १ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.