सातारा – सातारा पोलीस दलातील कर्मचारी अक्षय कांबळे याला अत्याचाराच्या गुन्ह्यात शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा पोलीस दलातील अनेक प्रेमवीरांनी चांगलाच धसका घेतला आहे. काहीजण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत तर काहीजण आता मी नाही त्यातला.. याप्रमाणे अंग झटकून वावरायला लागले आहेत.
पोलीस दलात कर्मचारी असलेल्या अक्षय कांबळे याने पोलीस दलातील एका महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करुन तिच्याकडून पन्नास हजार रुपये घेतल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कांबळे याला अटक केली आहे.
याप्रकरणामुळे पोलीस दलातील अनेक प्रेमवीरांनी चांगलाच धसका घेतल्याचे समोर आले आहे. खरे तर कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांकडूनच अशा घटना घडल्याने समाजात चर्चांना उधान आले आहे. ज्यांनी कायदा पाळायला हवा तेच त्याची पायमली करणार असतील तर लोकांनी नक्की कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या, असा सवाल विचारला जात आहे.