वाघोली – तत्कालीन आमदार बाबूराव पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली मध्ये दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढली होती. त्याच पद्धतीने नुकतीच संदीप भोंडवे यांची हवेली तालुका भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली असून भोंडवे यांच्या साथीने तालुक्यात गावोगावी कमळ फुलणार असल्याचे भाजप नेते गणेश कुटे यांनी सांगितले.
हवेली तालुक्यामध्ये गाव तेथे भाजपची शाखा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे कुटे यांनी सांगितले. हवेली तालुका भाजप पदाधिकारी यांच्या वतीने तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप भोंडवे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश सातव पाटील, वन मित्र चंद्रकांत वारघडे, स्नेहल कुलकर्णी, विद्या पाटील, नरेंद्र पाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे, उमेश मोरे, विशाल हरगुडे, केतन जाधव, गणेश सातव, विजय जाचक, अक्षय कुटे, विशाल कुटे, अविनाश कुटे, तुषार कुटे, अजित कुटे, अमोल कुटे, अविनाश कंद, संदीप कोलते, दिपक गाडूते, प्रदीप सातव आदी मान्यवर उपस्थित होते.