पासपोर्टवर कमळ; परराष्ट्र मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण 

नवी दिल्ली – केरळमध्ये कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले. यानंतर भाजपचे निवडणुक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित खुलासा केला आहे.

केरळच्या कोझिकोड येथे कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसचे खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा भाजपने घाट घातला असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावर खुलासा करताना परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी म्हंटले कि, कमळ हे आपले राष्ट्रीय फुलदेखील आहे. पुढेही वेगवेगळी राष्ट्रीय प्रतीके पासपोर्टवर छापण्यात येतील. बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. तर आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या आदेशानंतरच सेक्युरिटी फिचर्स छापले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यातच तुमच्या पासपोर्टवर भारताशी संबंधित राष्ट्रीय फुल अथवा प्राणी दिसून येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.