मुल्यवान मित्र गमावला

जेटलींना मोदींची आदरांजली
नवी दिल्ली: सध्या विदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथूनच दिवंगत माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल शोक संदेश पाठवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या संदेशात जेटलींचा उल्लेख त्यांनी आपले मुल्यवान मित्र असा केला आहे. त्यांची दृष्टी आणि विषयाची समज अनन्य साधारण होती असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी हे सध्या संयुक्त अरब अमीरातीच्या दौऱ्यावर असून तेथून ते पुन्हा फ्रांसला जाणार आहेत. तथापी त्यांच्या या नियोजित दौऱ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे.

मोदींनी संयुक्त अरब अमिरातीतून जेटली यांच्या पत्नी आणि मुलांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. या दोघांनीही मोदींनी आपला दौरा रद्द करू नये अशी विनंती केल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. पतंप्रधानांनी जेटली यांनी ट्‌विटरवर श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे की जेटली यांना समाजातील सर्वच घटकांमध्ये मान होता. ते एक बहुआयामी व्यक्तीमत्व होते. देशाची घटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे, प्रशासन आणि सरकार यांच्या कामकाज पद्धतीचे त्यांना सखोल ज्ञान होते. त्यांच्या सहवासाने आमच्यात आनंद निर्माण झाला होता. या आनंदाच्या स्मृतीच मागे ठेऊन ते गेले आहेत असेही मोदींनी म्हटले आहे.

देशाच्या आर्थिक विकासात आणि आपली संरक्षण सिद्धता मजबुत करण्यात तसेच लोकांना उपयोगी ठरतील असे कायदे बनवण्यात त्यांचे योगदान मोठे होते असेही मोदींनी नमूद केले आहे. जेटली यांनी केवळ सरकारच नव्हे तर भाजप पक्षासाठी दिलेल्या योगदानाचाही मोदींनी उल्लेख केला आहे. भाजप आणि जेटली यांच्यात एक अतुट नाते होते. एक धडाडीचे विद्यार्थी नेते म्हणून ते पुढे आले. आणिबाणीच्या काळात लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात त्यांचे योगदानही महत्वाचे आहे. त्यांनी लोकांच्या हितासाठी पक्षाची अनेक धोरणे आणि कार्यक्रम तयार केले त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षालाही मोठा लाभ झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)