डिकसळ : इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
या पावसाचा गहु पिकाला मोठा फटका बसला असून, मका, द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील पोंधवडी, कळस, शेटफळगडे,काझड,भिगवण, बोरी, डिकसळ भागातील शेतकऱ्यावर संकट कोसळलं आहे.