Ludo खेळामधील सततचा पराभव जिव्हारी; मित्राकडून मित्राची हत्या अन्…

मुंबई -अत्याधुनिक मोबाईल बाजारात आले आहेत. या मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या करमणुकी आहेत. विविध गेम्सही मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतात. या गेम्समुळं आता वाद होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत गेम खळताना झालेल्या क्षुल्लक वादाचे रुपांतर हत्येत झालं आहे. मोबाईल मधील (Ludo) लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात  संतप्त मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे.

मित्राची हत्या केल्याची बाब उघडकीस येऊ नये म्हणून या मित्रानेच 10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि मित्राचे अंतिम संस्कारही केल्याची धक्कादायक घटना मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 17 मार्च 2021 रोजी मृतक तुकाराम नलवडे (52) आणि त्याचा मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी (वय 34) हे मालाड दारू वाला कंपाऊंडमध्ये मोबाइलवर लुडो गेम खेळत होते. या गेममध्ये मृत तुकाराम वारंवार जिंकत होता, त्याचा राग काढत त्याचा मित्र जिमीने तुकाराम सोबत भांडण सुरू करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तुकारमचा मृत्यू झाला.

तुकारामच्या निधनानंतर आरोपी जिमीने बोरिवलीतील खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने 10 हजार रुपयांचे नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आणून मृतक परिवाराला दिले. त्यानंतर मालाडच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. तसेच शोकसभेचे देखील आयोजन करण्यात आले. मात्र मृताच्या पत्नीला आपल्या पतीच्या मृत्यूच्या कारणाची कुणकुण लागली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.