लोपीनाव्हीर आणि रिटोनाव्हीर या औषधांचा संयुक्त वापर करावा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुधारीत मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : कोविड19 आजारग्रस्तांवर उपचार करण्यासाठी आजारग्रस्त रुग्णाची स्थिती आणि आजाराची तीव्रता समजून घेत लोपीनाव्हीर आणि रिटोनाव्हीर या एच.आय.व्ही. प्रतिबंधक औषधांचा संयुक्त वापर करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

आरोग्य मंत्रालयानं कोविड19 या आजाराच्या उपचार व्यवस्थापनासंदर्भात आज सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली.
या सूचनांमध्ये ही शिफारस केली आहे. कोविड-19 वरच्या उपचारांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा सुचवणाऱ्या समितीत एम्स, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ प्रतिनिधींचा समावेश होता, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.