वडगाव येथे सोने व्यापाऱ्याला लुटले

मांडवगण फराटा : वडगांव नागरगाव रस्त्यावरील कुरणात सराफाला दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी धमकी देत सुमारे ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जयंतीलाल कांतीलाल ओसवाल यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल हे सोन्याचे व्यापारी असून ते सोन्याचे दागिने सप्लाय करण्याचा व्यवसाय करतात. दि.२५ रोजी फिर्यादी ओसवाल हे नेहमीप्रमाणे सकाळी उरुळी कांचन येथून दुचाकीवरून दागिने घेऊन निघाले.

काष्टी येथील काम आटोपून ते तांदळी मांडवगण फराटा या रस्त्याने जात होते. दरम्यान वडगाव रासाई ते नागरगाव दरम्यान कुरणात आले असताना दुचाकी वरून आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांना धमकावून फिर्यादी ओसवाल यांच्या जवळ असणाऱ्या पिशवीतून प्लॅस्टिक बॅग मध्ये असलेले दागिने, लहान कापडी पिशवीत असलेले असे सर्व प्रकारचे मिळून सुमारे २००ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व कळी बॅग असा एकूण ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

यानंतर फिर्यादी यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत अज्ञात आरोपी विरुध्द तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर पोलिसांनी तक्रार दाखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.