नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव घाटातील घटना
नगर – मुंबई येथून नांदेडकडे चाललेल्या पिकअप अडवून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोघांना लुटले. नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, मुंबईहून नांदेडकडे पिकअपमधून (क्र. एमएच 26, एडी 9949) दोघे चालले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव शिवारात हॉटेल सुवर्णज्योत जवळील चढावर तीन ते चार जणांनी लाकडी दांडक्याच्या धाकाने दहा हजार रुपयांची रोख रक्कम, एटीएम कार्ड, लायसन असे साहित्य बळजबरीने हिसकावून घेतले. त्यानंतर लुटारू पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदींसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मोहम्मद वसीम बागवान (रा. रामरहीमनगर, देगलुल नाका, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.