मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमविरसिंह यांच्या विरोधात पोलिसांनी एका खंडणी प्रकरणात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ठाणे पोलिसांच्यावतीने ही नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजीतसिंह यांनी दिली.
23 जुलै रोजी परमविरसिंह यांच्या विरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेली ही दुसरी केस आहे.
या प्रकरणात ठाणे पोलिसांनी सात पोलिस अधिकाऱ्यांची एक एसआयटी नेमून या प्रकरणाची चौकशी केली असता त्यात परमविरसिंह हे दोषी असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर परमविरसिंह आणि अन्य पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणून त्यांच्या विरोधात ही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.