“तू ऍव्हरेज दिसतेस’ असं सांगून निर्मात्यांनी परत पाठवले होते – रकुलप्रीत सिंह

रकुलप्रीत सिंहला बॉलीवूडमधील प्रस्थापित अभिनेत्री म्हणता येणार नाही, पण “दे दे प्यार दे’ या पहिल्यावहिल्या चित्रपटालाच चांगली पसंती मिळाल्यामुळे ती अनेक बॉलीवूड निर्मात्यांच्या नजरेत आली. यानंतर “मरजॉंवा’सारख्या चित्रपटातील काही दृश्‍यांमध्येही ती दिसली. पण दुर्दैवाने तिच्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही किंवा नोटीस करण्यासारखे तिच्याकडूनही काही घडले नाही. त्यामुळे आता रकुल प्रीत सिंह केवळ कॅमियो किंवा आयटम नंबरमध्येच दिसते. पण तेवढ्यावर समाधान मानणारी रकुल नाही. त्यामुळे तिने आतापासूनच आपल्या आगामी प्रोजेक्‍टच्या प्रमोशनचे फंडे अवलंबायला सुरुवात केली आहे.

सध्या रकुल आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहन करताना दिसत आहे. कारण बॉलीवूडच्या रंगबिरंगी आणि अत्यंत वेगाने धावणाऱ्या इंडस्ट्रीत टिकायचे झाल्यास रोज नवं काही तरी करावं लागतं, हे रकुलला चांगलेच माहीत आहे. यासाठी ती काही ना काही क्‍लृप्त्या करत असते. गंमत म्हणजे अन्य नायिकाही आता रकुलसारखे फंडे अवलंबू लागल्या आहेत. अर्थातच, मायानगरी मुंबईमध्ये आल्यानंतर सिलव्हर स्क्रिनपर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय असतो.

रकुलही सांगते की आज जरी ती चांगली स्टार बनलेली असली आणि तशी ओळख मिळवलेली असली तरी सुरुवातीला तिला बराच संघर्ष करावा लागला आहे. अगदी सुरुवातीला तर निर्माता आणि कास्टिंग डायरेक्‍टर यांनी रकुलला “तू ऍव्हरेज दिसतेस’ असं सांगून परत पाठवले होते. रकुल म्हणते मला आलेला बॉडी शेमिंग एक्‍स्पिरियन्स मी कधीच विसरू शकणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)