थंडी गळणा-या केसांवर उपाय शोधताय… मग हे कराच!

थंडी  पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची   काळजी घेणं आवश्‍यक आहे.  ( winter hair care tips in marathi ) थंडीत केस कोरडे होणे, गळणे अशा विविध समस्या उद्‌भवायला लागतील. या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणती तेलं आहेत जी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी पोषक ठरतील हे जाणून घेऊ या.

केसांप्रमाणेच थंडीचा परिणाम त्वचेवरही होताना दिसतो. त्वचा कोरडी होते, ओरखडे उमटतात. भेगा पडतात. इतकंच नाही तर काही जणांची त्वचाही काळवंडते किंवा त्वचेला खाज उठते. अशा या त्वचेचं थंडीपासून संरक्षण करायला हवं. त्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेऊ या.

केसांची काळजी
ज्यांना सकाळी लवकर बाहेर पडायला लागतं त्यांनी केस कव्हर करा. कव्हर करा म्हणजे झाका. बोचरे वारे आणि या  वाऱ्यामुळे धुळीचे कण तुमच्या केसांत जाऊन ते खराब होणार नाहीत. आपल्याकडे हॅट घालण्याची पद्धत नाही. त्यामुळे तुमचे केस संपूर्ण झाकतील असे स्कार्फ वापरा.

आठवड्यातून एकदा तरी केसांना डीप कंडिशननिंग करा. यामुळे केसांना मॉइश्‍चर मिळेल. तसंच शॅम्पू केल्यावर केस अतिशय कोरडे होतात. ( winter hair care tips in marathi ) त्यामुळे शॅम्पू केल्यावर केसांना तेल लावावं. म्हणजे त्यांना पोषण मिळेल आणि ते मऊ आणि चमकदार दिसतील.

आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा केस शॅम्पूने धुतल्यास कोरडे होण्यापासून वाचतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे केस कोरडे असले पाहिजेत. दुसरं असं की ओले राहिले तर तुमच्या केसातलं मॉइश्‍चर थंड हवेमुळे तिथेच थिजू शकतं. जेणेकरून तुमचे केस

कोरडे होणार नाहीत आणि तुटणार नाहीत.
हिवाळ्यात नियमितपणे म्हणजे दर सहा ते आठ आठवड्यांनी तुम्ही तुमचे केस ट्रीम करा. म्हणजे केस दुभंगणार नाहीत.

तेल कोणते वापराल?
हल्ली केस गळण्याच्या समस्या खूप ऐकायला मिळतात. विशेषत: केस धुताना केस अधिक गळतात. थंडीच्या दिवसात तर ही समस्या अतिशय कॉमन झाली आहेत. केस गळतीमागे विविध कारणं असू शकतात. त्यात आपली बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे केस अधिक गळतात. त्यासाठी आपण कित्येक जाहिरातींना बळी पडतो. आणि तेल विकत आणतो. पण आपल्याकडे अशी काही नैसर्गिक तेलांचे प्रकार आहेत जी नियमित लावली तर आपल्या केसांचं आरोग्य सुधारेल.

ऑलिव्ह ऑईल-
ऑलिव्ह ऑईल गरम करून टाळूवर मसाज करा. एक दोन तास तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवा. असं केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.

बदाम तेल-
बदामात नैसर्गिकरीत्याच डी आणि ई जीवनसत्त्व असतं जे तुमच्या केसांना नैसर्गिकपणे मॉइश्‍चर देतं आणि कोरडे किंवा खराब होण्यापासून त्यांचा बचाव करते. म्हणूनच केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने केसांना मसाज केला तर तुमचे केस मजबूत होतात.

खोबरेल तेल-
खोबरेल तेल घेऊन त्याने केसांच्या मुळाशी बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे खराब झालेले केस किंवा दुभंगलेले केस व्यवस्थित करण्यास मदत करतात. तेल गरम करून टाळूवर लावल्यावर तिथलं रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि केसांना आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन त्यातून मिळतो.

एरंड तेल-
आपल्याला माहीत नसतं मात्र एरंड तेल असं तेल आहे जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. दररोज केसांच्या मुळाशी लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि नैसर्गिकरीत्या केसांना ऑक्‍सिजन पुरवला जातो. परिणामी केस वाढतात. त्यात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा 6 नावाचं ऍसिड असल्याने केसांना त्यामुळे मॉइश्‍चर मिळतं. आणि दुभंगण्यापासून बचाव होतो.

कोरफड आणि खोबरेल तेल-
कोरफडीत अँटीबॅक्‍टिरिअल आणि अँटीफंगलचे गुण असतात. ( winter hair care tips in marathi ) ज्यामुळे कोंडयापासून बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच कोरफडीचं गर खोबरेल तेलात घालून ठेवावा. असं हे मिक्‍स केलेलं तेल टाळूला लावून ठेवावं. अर्ध्या तासानंतर धुऊन टाकावं. म्हणजे चाईचा त्रास होत नाही आणि रक्ताभिसरणही सुरळीत होतं.

आवळा आणि खोबरेल तेल-
आवळा हे केसांचं टॉनिक असून केसांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आवळ्याची पूड खोबरेल तेलात घालून केसांच्या मुळांशी लावल्याने मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. केसांत कोंडा होणे आणि अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.