fbpx

“आरआरआर’मधील ज्युनियर एनटीआरचा लूक रिलीज

“बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौलीचा बहुभाषिक चित्रपट “आरआरआर’मधील ज्युनियर एनटीआर साकारत असलेल्या “भीम’ या भूमिकेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर खूप दमदार असून यातून एक रोमांच निर्माण होत आहे.

टीझरमधील दृश्‍यांमधून भीमच्या भूमिकेची अमर्याद ताकद आणि इच्छाशक्‍ती दाखविण्यात आली आहे. त्याला जंगलातील विचित्र परिस्थितीत धावताना-पळताना दाखवले आहे. तसेच त्याला समुद्र थांबविण्याची क्षमता असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

टीझरमधून चित्रपटातील विहंगम आणि विशाल कॅन्व्हास असल्याचे दिसून येते, ज्यासाठी एस. एस. राजामौली हे ओळखले जातात. आलिया भट्टने टीझर शेअर करत पोस्ट केले की, “भीमबद्दल सांगायचे झाल्यास आपल्याला रामाराजूपेक्षा जास्त कोण असू शकेल? या भीमला भेटा.’

या चित्रपटात आलिया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर अजय देवगणदेखील एक विशेष भूमिकेत दिसणार आहे. वास्तविक, या चित्रपटाची कथा एका काल्पनिक प्रश्‍नावरून उद्‌भवली आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल 450 कोटी रुपये असून हा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.