इकडे लक्ष द्या

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगरला उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीविषयक प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे 17.56 कोटी रुपये शेअरमध्ये गुंतविले आहेत तर वायनाडला उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 5.19 कोटी रुपये शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक असणाऱ्या म्युच्युअल फंडांत गुंतविले आहेत.

पूर्वी अचल संपत्ती म्हणजे जमीन जुमला हीच संपत्ती मानली जात होती, पण आता नव्या गुंतवणुकीकडे राजकीय नेत्यांचेही लक्ष गेले आहे तर ! ही गुंतवणूक पारदर्शी आणि करपूर्तता करणारी असल्याने तिचे स्वागत केले पाहिजे आणि संपत्ती निर्मितीचा राजकीय नेत्यांनाही आकर्षित करणाऱ्या या मार्गाकडे आपणही पाहिले पाहिजे!

Leave A Reply

Your email address will not be published.