पोलिसांची हाणामारी बघ्यांकडून व्हायरल

मारामारी करणारे चार पोलीस कर्मचारी निलंबित 

भंडारा: मागील एका आठवड्यापासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दोन पोलीस कर्मचारी एकमेकांना मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात घडत असल्याने बघ्यांनी या घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल केले आहे. व्हिडीओ वायरल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या व्हिडिओतील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे

पोलिस मुख्यालयातील पोलिस नायक विकास गायकवाड, पोलिस नायक निलेस खडसे, पोलिस नायक विष्णू खेडीकर व मोटर परिवहन विभागात कार्यरत चालक पोलिस नायक मनोज अंबादे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत.

दरम्यान संबधीत पोलिस कर्मचारी जिल्हा कारागृहातील कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन आले होते. यादरम्यान, पोलिसांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. चक्क पोलिसच सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना मारहाण करीत असल्याने, या प्रकाराचे अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले.

सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच ,पोलिस दलात एकच खळबळ उडाली. तथापि सार्वजनिक ठिकाणी केलेली मारामारी ही पोलिस दलाची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी असल्याने, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चारही पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here