मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे अभिनेत्री “क्रिती सनॉन’ रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘क्रिती सनॉन’कडे पाहिलं जातं.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी क्रितीची अनेकांनी तारीफ केली होती.
पण तुम्हाला माहिती आहे का की क्रिती सनॉन इतकीच सुंदर आणि लुकनंही सारखी असलेली एक हॉलिवूड अभिनेत्री आहे तिचं नाव आहे ‘सारा कॅनिंग’. या दोघेही हॉटनेस मध्ये एकमेकींना तुफान टक्कर देतात.
सारा कॅनिंग ही एक कॅनेडियन अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सारानं ‘व्हँपायर डायरीज’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे.
सारानं आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये केली होती, तर क्रितीनं आपल्या करियरची सुरूवात 2014 मध्ये केली होती. सारा आता अनेक मोठ्या आणि हिट शोमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे क्रिती भेडिया, आदिपुरुष आणि बच्चन पांडेमध्ये दिसणार आहेत.