परतूर : बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाच्या संदर्भात जे विधान केले ते अत्यंत खेदजनक आहे. लोणीकरांसारख्या मराठा समाजाच्या नेत्यांमुळेच मराठा समाज अडचणीत येत आहे. समाजाचे असून समाजाबद्दल असे बोलत असतील तर समाजाने यांना तेथे ठेवू नये.
अशा लोकांना शंभर टक्के धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. आष्टी येथे लोणीकर यांनी प्रचारादरम्यान मराठा समाजाची मते हाताच्या कांड्यावर मोजण्या इतकी असल्याचे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर समाजातून मोठी टीका होत आहे.