लाल वादळ पुन्हा मुंबईला धडकणार; किसान सभेचा लॉन्ग मार्च नाशिकहून रवाना 

नाशिक – अनवाणी पायाने मुंबईत शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला वर्ष झाले तरी अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा अखिल भारतीय किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे. गुरुवारी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. सुमारे साडेसात हजार आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन महाजनांनी दिले. परंतु, शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम आहेत. दरम्यान, मोर्चातील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. त्यामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी, बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.