पुणे – रेल्वेगाड्यांची ये-जा सुलभपणे व्हावी आणि स्टेशनमध्ये जास्त गाड्यांना सामावून घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे लांब अंतराच्या लूप लाईन्स तयार करत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारितील विजयवाडा विभागातील विजयवाडा- विशाखापट्टणम या अतिशय वर्दळीच्या मार्गावरील बिक्कावोलू स्थानकावर हे काम सुरु झाले आहे.
लूप लाईन म्हणजे काय?
रेल्वेगाड्यांची ये-जा जलदपणे व्हावी आणि स्टेशन परिसरात जास्त गाड्यांना सामावून घेता यावे यासाठी त्याठिकाणी लूप लाईन्स तयार करण्यात येतात.