लंडन हल्ल्यातील मृत दहशतावाद्याला पाकिस्तानात प्रशिक्षण

यापुर्वी दहशतावादी कृत्याबद्दल शिक्षा
आठ वर्षानंतर संचित रजेवर बाहेर
हल्ल्यात दोन जाणांचा मृत्यू, तिघे जखमी

उस्मान खान
उस्मान खान

लंडन : लंडन येथे शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर अन्य तीन जण जखमी झाले. हा हल्ला करणाऱ्या मृत दहशतवाद्याची ओळख पटली आहे. त्याला पाकिस्तानमधील दहशतवादी तळातून प्रशिक्षण घेऊन लंडन स्टॉक एक्‍सेंजच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याबद्दल शिक्षा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने मुंबईसारखा लंडनच्या पार्लमेंटवर हल्ला करण्याबाबत त्याने चर्चा केली होती. या दहशतवाद्याचे नाव उस्मान खान असे असून त्याला 2012 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली दीर्घकालीन कारावासाची शिक्षा ठोठावली होती. तो जनतेत मिसळणे धोकादायक असल्याचे मत न्यायलयाने नोंदवले होते.

लंडन ब्रिजच्या फुटपाथवर खान आला. त्याने भोसकून एक पुरूष आणि एका महिलेची हत्या केली. तर अन्य तीन जणांना जखमी केले. त्यानंतर खानला लंडन पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. उस्मान खान (वय28) असे त्याचे नाव असून तो स्टॅफोर्डशायर भागातील रहिचासी होता, असे स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख नील बासू यांनी सांगितले. ते म्हणाले, हा आरोपी प्रशासनाला माहित होता. 2012मध्ये त्याला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याला सर्शत परवानगीने डिसेंबर 2018मध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याने हा दहशतवादी हल्ला कसा घडवला, हेच आता तपासाचे सूत्र असेल.

खानचे मूळ हे पाकव्याप्त काश्‍मिरमधील असून तेथील दहशतावादी छावण्यात प्रशिक्षणासाठी इंग्लंडमध्ये भरती करण्यासाठी त्याने केलेले गुप्त संभाषण ध्वनी मुद्रीत करण्यात आले होते. तो आधी अल-कायदा आणि नंतर इस्लामिक स्टेटस्‌शी संबंधित होता. शहादा ( शहीद) झालो किंवा त्यांच्या कारागृहात पोहोचलो तर तो आपला विजय असेल, असे तो आपल्या सहकाऱ्यांना सांगत असे.त्याला दिलेल्या शिक्षेच्या विरोधात त्याने 2013मध्ये अपिल केले होते. त्यात त्याची शिक्षा 16 वर्षांची निश्‍चित करण्यात आली होती. तसेच आठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याला पॅरोलवर सोडता येणार नसल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार तो संचित रजेवर सर्शत बाहेर आला होता. इलेक्‍ट्रॉनिक टॅगच्या माध्यामातून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)