‘भुशी डॅम’ ओव्हर फ्लो; लोणावळ्यात पर्यटनासाठी जायंच त्याआधी वाचा ही बातमी

पुणे – राज्यात मान्सून अनेक ठिकाणी सक्रिय झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मुंबई पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान दोन दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाले आहे. भुशी डॅम ओव्हर फ्लो जरी झाले असले तरी पर्यटकांना या धरणावर येण्यास बंदी आहे.

पावसाळा सुरु झाला म्हणजे मुंबई-पुणेकरांचे आवडते पर्यटनस्थळ लोणावळ्यातील भुशी डॅम आहे. याठिकाणी दरवर्षी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे भूशी डॅम ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र करोनाचे सावट असल्यामुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भूशी डॅमवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाची मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटन बंदी आदेशामुळे पर्यटकांना धरणाच्या पाण्याखाली जाऊन भिजण्याचा आनंद यावर्षीदेखील घेता येणार नाही. कोरोना महामारी मुळे मागील वर्षीपासून पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे भुशी धरण हे पर्यटकांना मुकले आहे. या वर्षी देखील अद्यापही पर्यटन बंदी कायम असल्याने पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे.

पर्यटकांना बंदी असून सुद्धा काही पर्यटक लपूनछपून भुशी धरण परिसरात येत आहेत. भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.