Loksabha Election । लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर फक्त दोन टप्पे उरले आहेत. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील आजच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 8 राज्यांतील 49 जागांवर मतदान सुरू झाले आहे. याच टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे.
१३ मतदारसंघासाठी आज मतदान Loksabha Election ।
राज्यात मतदान होणा १३ मतदारसंघासाठी आज मतदानऱ्या १३ मतदारसंघांमध्ये मुंबई व लगतचे मिळून १० मतदारसंघ आणि नाशिक, दिंडोरी आणि धुळे यांचा समावेश आहे. या ठिकाणी मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. मुंबईत मतदान केंद्रांवर बावीस हजारांहून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
बड्या नेत्यांचे भविष्य आज ठरणार Loksabha Election ।
उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड असे दिग्गज रिंगणात आहेत. राज्यातील १३ जागांपैकी ११ जागा सध्या महायुतीकडे आहेत. मात्र, एकूण स्थिती पाहता सर्वच मतदारसंघांमध्ये तोडीस तोड लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे