Loksabha Bypoll : भंडारा- गोंदियात आजही मतदान यंत्रात बिघाड

गोंदिया : मतदान यंत्रातील बिघाडामुळे गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत आज फेरमतदान होत आहे. ४९ ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जात आहे. मात्र आजही मतदान यंत्रातील बिघाडाच्या घटना घडत आहेत.

गोंदिया शहरातील माताटोली मतदान केंद्रावरील इव्हीएममध्ये बिघाड झाला. बटण दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान होत आहे. सकाळी तास-दीडतासभर हा बिघाड होता, तो दूर करण्यात आला. दरम्यान २८ मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)