भेंडा – नेवासे तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत 21 जागांसाठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 6 जानेवारी रोजी झालेल्या छाननीमध्ये 282 पैकी 135 अर्ज पात्र, तर 147 अर्ज अपात्र ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या (गुरुवार दि.21) दिवशी 114 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या सर्व 21 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
बिनविरोध निवडून आलेले संचालक असे-
शेवगाव गट- सुधाकर नारायणराव नरवडे, पंडित रामभाऊ भोसले.
शहरटाळकी गट- नरेंद्र मारुतराव घुले, चंद्रशेखर मारुतराव घुले.
कुकाणा गट – पांडुरंग गमाजी अभंग, नारायण कारभारी म्हस्के.
नेवासे गट- विठ्ठलराव वकीलराव लंघे, काकासाहेब आबासाहेब शिंदे, गोरक्ष दगडू गंडाळ.
वडाळा गट- भाऊसाहेब सोन्याबापू कांगुणे, जनार्दन रामभाऊ कदम, शिवाजी राजधर कोलते. ढोरजळगाव गट- मच्छिंद्र सूर्यभान म्हस्के, बबनराव मुरलीधर भुसारी, सखाराम दिगंबर लव्हाळे. अनु.जाती/जमाती मतदारसंघ- दीपक तुळशीराम नन्नवरे.
महिला प्रतिनिधी मतदारसंघ- ताराबाई हनुमान जगदाळे, रत्नमाला काशिनाथ नवले.
भटके-विमुक्त मतदारसंघ-लताबाई अशोक मिसाळ.
नामाप्रवर्ग मतदारसंघ- शंकर लक्ष्मण पावसे.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक- पणन संस्था मतदारसंघ- देसाई भाऊसाहेब देशमुख.