1150 विद्यार्थ्यांचा सहभाग; इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद
नागठाणे – स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त जगभरात 143 देशात महिलांद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका डॉ. बी. के. सुवर्णा व डॉ. बी. के. दीपक हारके यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती विश्वविक्रम करून साजरी केली.
आदर्श विद्या मंदिर विंग (ता. कराड) च्या 1150 मुलांनी मुख्याध्यपिका सौ. एस. के. ढवळे. यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक जयंती आकारात बसून विश्वविक्रम करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी केली. याची नोंद इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे.
या विश्वविक्रमानंतर डॉ. बी. के. सुवर्णा यांचे 62 विश्वविक्रम झाले आहेत व डॉ. बी. के. दीपक हारके यांचे 128 विश्वविक्रम झाले आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श विद्या मंदिर विंगच्या कुंभार व त्यांच्या सर्व शिक्षक सहकारी तसेच बी. के. अंकिता, बी. के. सूर्यकांत बागल व साधकांनी परिश्रम घेतले.