लोकमान्य सोसायटीची ‘सुवर्ण अंकुर’ गुंतवणूक योजना

मर्यादीत कालवधीसाठी उपयोगी

पुणे – आपल्या गरजेला साजेश्‍या कमी व अधिक कालावधीच्या गुंतवणूक योजना संस्था नेहमीच आपल्या ग्राहक, सभासद व गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देत असते. त्याला साजेशी आपल्यासाठी व आपल्या कुटुंबियांच्या उज्वल भविष्यासाठी फलदायी ठरणारी सुवर्ण अंकुर ही नवी गुंतवणूक योजना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने सादर केली आहे.

मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच 27 महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या योजनेत ग्राहक, सभासद व गुंतवणूकदारांना किमान 10 हजार रूपये व त्यापेक्षा अधिकची रक्कम गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के अधिकचे व्याज आहेच. विशेष म्हणजे या योजनेत त्रैमासिक व्याजाचा परतावा घेण्याची सोय असून आजच्या आर्थिक परिस्थितीत तो आकर्षक असा आहे.

संस्थेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच घरबसल्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉमच्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com/deposit) देखील या योजनेमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गरजेनुरूप कमी-अधिक कालावधीचे विविध गुंतवणूक पर्याय देखील संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

संस्थेच्या विविध सेवा सुविधांच्या माहितीसाठी ग्राहक, सभासद, गुंतवणूकदार 18002124050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घावी आणि नेहमी मास्क लावावे, नियमित अंतराने हात स्वच्छ करावेत, सामाजिक अंतर राखावे तसेच शासनाने लागू केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.