लोकेश राहुलला डेट करतेय अथिया शेट्टी

भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. अथिया शेट्टीने “हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केले आहे. तर अनिस बज्मीच्या “मुबारकां’मध्येही तिने आपले नशीब आजमावून पाहिले आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपट आपटल्यानंतर सध्या अथियाच्या लव्ह लाईफच्या चर्चेमुळे प्रसिद्धिच्या झोतात आली आहे.

यावर्षी फेब्रुवारीपासून अथिया व केएल राहुल यांनी एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जातात. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. कॉमन फ्रेन्ड आकांक्षा रंजनने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अथिया व केएल राहुल एकत्र दिसत आहे. हा फोटो एप्रिलमध्ये शेअर केला गेला होता.

या फोटोमुळे त्यांच्या नात्यांच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. तसेच अथिया आणि राहुल यांची ओळख देखील आकांक्षामुळे झाल्याचे म्हटले जात होते. या फोटोवर अथिया काय कमेंट करते याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी लोकेश राहुलचे नाव अभिनेत्री सोनम चौहान आणि निधी अग्रवालसोबतही जोडले गेले होते. पण या दोन्ही अभिनेत्रींनी याचा इन्कार केला होता. निधी अग्रवालने तर राहुल माझ्या भावासारखा असल्याचे म्हटले होते. तूर्तास अथियाने या वृत्ताचे खंडन केलेले नाही. त्यामुळे दोघेही याबद्दल काय खुलासा करतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.